HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

गजानन मारणेचं साम्राज्य उध्वस्त करणार ,पुणे पोलिसांनी ललकारलं…!

पुणे | राज्यभरात सध्या पुण्यातील गुंड म्हणुन ओळखल्या जाणऱ्या गजानन मारणेची चर्चा सुरू आहे. नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटल्यानतंर मारणे समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीमुळे अनेकांना महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहारची आठवण झाली आणि या सगळ्या प्रकरणावरून प्रशासनावर प्रचंड टीकेची झोड उठली. आता हे सगळ ताजं असतानाच गजानन मारणे हा फरार झाल्याने पुणे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. पुणे पोलीस आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आता गजानन मारणे ला ललकारलं आहे. गुंड गजानन मारणे याचं साम्राज्य उद्धवस्त करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

तळोजाहून पुण्यात येताना वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियम पाळायला सांगण्यासाठी आलेल्या पोलिसांना गजा मारणे आणि त्याच्या टोळीच्या सदस्यांनी धक्काबुक्की केली होती. त्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल होता. मात्र पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळताच गजा मारणे आणि त्याच्या टोळीचे सदस्य फरार झाले आहेत. तसं प्रसिद्धी पत्रकच पोलिसांनी काढलं आहे.

Related posts

इतरांचे ट्विट समजण्यासाठी स्वत:चे ट्विटर स्वत: वापरावे लागते, राऊतांचा पुन्हा कंगनाला टोला 

News Desk

राजकारणातील जुनी खाट ‘काँग्रेस’ महाराष्ट्राच्या राजकारणात का कुरकुरतेय ?

News Desk

पवारांनी राज्यातील भीषण दुष्काळावर मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

News Desk