HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्या पायऱ्यांवरून पळताना पडले; पुण्यात शिवसैनिकांचा राडा

पुणे | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. किरीट सोमय्या आज (५ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिकेत गेले होते. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मात्र त्यांची वाट अडवली. त्यानंतर मागे परतत असताना सोमय्या पायऱ्यांवर पडले.

किरीट सोमय्यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला होता. या संदर्भातच भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यासाठी ते शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर सोमय्या पुणे महापालिकेत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र यादरम्यान परिसरात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सोमय्या महापालिकेत पोहोचताच तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांची गाडी अडवली. तर काहींनी त्यांच्या गाडीसमोर लोटांगण घालत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे तेथील वातावरण तणावाचे बनले होते.

तसेच यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना परत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मागे परतताना सोमय्या पायऱ्यांवरून खाली पडले. यावेळी त्यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान या घटनेनंतर सोमय्यांनी यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला’, असं ट्वीट सोमय्या यांनी केलं आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर सवाल उपस्थित केला आहे. “सरकार तुमचं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता?” असा सवाल पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करण्याचा निर्णय घेणार! – चंद्रकांत पाटील

Aprna

दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात ३ घरे कोसळली, १ मृत्यू

News Desk

मुंबई पोलिसांना बदनाम करण्याच्या प्रकरणात सायबर सेलकडून २ गुन्हे दाखल

News Desk