मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाचं रान उठवलं आहे. अनेक आरोप, टीका केल्या आहेत. दरम्यान, आता किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संपत्ती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती लपवली असल्याचा आरोप करत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे.
श्री उद्धव ठाकरेचे 19 बंगलो
प्रताप सरनाईकचा 78 एकर जमीन ED चा ताब्यात
संजय राऊत प्रवीण राऊतचे पार्टनर
महाकाली मंदिर/गुंफाची जमीन बिल्डरला
BMC नी दहिसरचा ₹2.55 करोडचा जागेचे बिल्डरला ₹349 करोड दिले
5000 खाटांचा ₹12,000 कोटीचा कोवीड hospital घोटाळा
आणखी किती पुरावे हवेत
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 11, 2021
Today 11 January 3.30pm I will meet CEO Baldeo Singh Election Commision Mantralaya Mumbai, to submit Complaint against CM Uddhav Thackeray for Non Disclosure/Concealment of Properties 19 Bunglows (Korlai Alibag) Rs 5 Crore in his election affidavit @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 11, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.