HW News Marathi
महाराष्ट्र

“… तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”, धनंजय मुंडे प्रकरणाने राजकारण पेटलं 

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय अडचणीत सापडले आहेत, एकीकडे विरोधी पक्ष भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं याबाबत संयमाची भूमिका घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊ असं सांगत पवित्रा घेतला आहे.

यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच हवा असं म्हटलं आहे. मात्र किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे ते सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. त्यात महेश गिते, जयकांत राख, अक्षय तिडके, राम डोईफोडे, रमेश नागरगोजे यांचा समावेश आहे.

तसेच काल (१७ जानेवारी) सकाळी ११.३० वाजता दोनदा धमकीचे फोन आले, सर्व ६ बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार, गेल्या २ दिवसांपासून धमकीचे फोन सुरूच आहे. याबाबत मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना किरीट सोमय्या यांनी पत्र लिहून कळवलं आहे. दुर्देवाची बाब म्हणजे अद्याप पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. फक्त तक्रार नोंद केली आहे अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रॅगचा खेळ सुरू” – नवाब मलिक

News Desk

कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन

News Desk

आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकारांची वानवा! – सुभाष देसाई

Aprna