HW News Marathi
महाराष्ट्र

‘किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल’; नवाब मलिकांचा टोला

नांदेड | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मलिक यांनी किरीट सोमय्या यांची बॉलिवूडच्या आयटम गर्लशी तुलना केली आहे. ज्याप्रमाणे चित्रपट चांगला चालावा, त्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी जशी त्या चित्रपटात आयटम गर्ल असते त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रातील भाजपमध्ये सोमय्या आयटम गर्ल सारखे काम करतात, असं वादग्रस्त विधान मलिक यांनी केलं आहे.

किरीट सोमय्या हे नेहमीच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सातत्याने आरोप करत असताना दिसून येतात. तर सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित नेत्यांवर ईडीची कारवाई देखील झाली आहे. त्यामुळे यावरून सोमय्या आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतात.

मलिक यांच्या या वादग्रस्त विधानाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मलिकांच्या या टीकेवर आता किरीट सोमय्या आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नांदेड येथे मीडियाशी संवाद साधताना मलिक यांनी ही टीका केली आहे. तर नुकतंच सोमय्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सोमय्या चक्क सरकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून नगरविकास खात्याच्या फाईल्स चाळताना दिसत आहेत.

दरम्यान, सोमय्यांच्या त्या व्हायरल फोटोवरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मंत्रालयातील फाईल्स तपासण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल केला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही मलिकांनी भाजप नेत्यांवर अनेक आरोप केले होते. ड्रग्स प्रकरणात मलिकांनी भाजप नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. अशातच चित्रपट चालवण्यासाठी जशी आयटम गर्लची गरज लागते. तसं मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्लसारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे, अशी टीका मलिकांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अँस्ट्राँसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन 

News Desk

“पवारांनी MPSC विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केली”, गोपीचंद पडळकरांचा आरोप

News Desk

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा गेम प्लॅन तयार

News Desk