HW News Marathi
महाराष्ट्र

’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’- किरीट सोमय्या

मुंबई | “महाराष्ट्राची जनता ठाकरे-पवार माफिया सरकारच्या राक्षसी वृत्तीचं दहन करणार, हे मी वचन देत आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील. आर्धे कोर्टात धक्के खात असतील, आर्धे ईडी, कुणी सीबीआय तर कुणी इन्कम टॅक्सकडे, तर कुणी मुंबई पोलिसात असेल. कालपासून जेलमध्ये जायची सुरुवात झालीय”, असा घणाघात सोमय्या यांनी केला.

पोलीस आणि सोमय्यांमध्ये बाचाबाची

सोमय्या यांच्यासोबत यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते होते. खरंतर ठाण्याचे नवघर पोलीस आज (15 ऑक्टोबर) किरीट सोमय्यांच्या कार्यालयात आले होते. पोलिसांनी सोमय्यांना कलम 144 ची नोटीस दिली. यावेळी पोलीस आणि सोमय्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. नोटीस देऊन पोलीस परतले. त्यानंतर सोमय्यांनी भ्रष्टाचारी रावणाचं दहन केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दसरा सणाच्या निमित्ताने रावण दहनाचं वेगळं आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

“या घोटाळेबाज सरकारला घालवण्यासाठी मला अंदमान-निकोबार जेलमध्ये जावं लागलं तरी मी हसत-हसत जाणार. माझ्याविरोधात अब्रुनुकसाणीचा दावा केलाय. एकवेळा काय सतरा वेळा जेलमध्ये जाणार. पण या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त सरकार करुन दाखवणार”, असं देखील किरीट सोमय्या यावेळी म्हणाले. हिंदुस्तानातील सर्वात मोठी आयकर विभागाची धाड सुरुय. धाडीचा नऊवा दिवस आहे. पवारांनी किती माया (पैसे) जमावली आहे ते काही दिवसांत बाहेर येणार. अजित पवारांच्या बेनामी प्रॉपर्टीचा मी खुलासा केला. याबाबत अजित पवारांकडून आजपर्यंत काहीही स्पष्टता आलेली नाही. या घोटाळेबाजांना धडा शिकवण्यासाठी चला आपण रावण दहन करुया”, असं यावेळी सोमय्या म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरण मंत्र्यांची दिशा चुकली, मग आता वनमंत्री पूजा घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत, नितेश राणेंचा प्रहार  

News Desk

अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी २२ उपकेंद्रे प्रस्तावित – नितीन राऊत

Aprna

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk