मुंबई | महाविकासआघाडीचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आज (१६ जुलै) ईडीने कारवाई करत त्यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. सचिन वाझेच्या जबाबामुळे उपमुक्ज्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री नाही परब यांच्यावर कारवाई करण्याची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या कारवाईवरुन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांची 2010ची मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे. आता हळूहळू 2020 आणि 2021 ची मालमत्ताही सापडेल, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
शरद पवार यांचे वसुली एजंट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरे यांचे एजंट अनिल परब
महाविकासआघाडी वर सध्या ईडीचं सावट आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी हा काळा पैसा आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये गुंतवला होता. त्यावर ईडी लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हा सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा. त्यानंतर परमबीर सिंग, अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यासाठी काम करायचा, असा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार यांचे वसुली एजंट अनिल देशमुख आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे एजंट अनिल परब असल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
अनील देशमुख ₹१०० कोटीचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात गुंतले आहे. आज ईडीने 420 लाख ची मिळकत जप्त केली, हळू हळू ₹100 कोटींची मालमत्ता जप्त होणार
मला खात्री आहे की एके दिवशी अनिल देशमुखला ईडीकडे हजर व्हावे लागणार आणि नंतर जेलला जावे लागेल @BJP4Maharashtra pic.twitter.com/DyEBMcm0tM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 16, 2021
अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघेही एकदिवस तुरुंगात जाणार
किरीट सोमैया हे आपल्या विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. असंच एक विधान त्यांनी आता महाविकासआघाडी विरुद्ध केलं आहे. अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघेही एकदिवस तुरुंगात जाणार, असा दावा सोमय्या यांनी केलाय. अनिल देशमुख सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याचा प्रयत्न करतील. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हाकलून दिलेल्या नंतर त्यांना ईडीकडेच जावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की, हायकोर्टाने सांगितलं आहे की तपासाची व्याप्ती वाढवा. तर दुसरीकडे राज्य सरकार, अनिल देशमुख रोज एक पिटीशन टाकत आहेत आणि तपास थांबवा असं सांगत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.