HW News Marathi
महाराष्ट्र

परंतु हिशोब तर द्यावाच लागणार…सोमय्यांचा राऊतांना इशारा 

मुंबई | पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला समन्स बजावलं होतं. संजय राऊत यांच्या पत्नीवर पीएमसी बँकेकडून काही कर्ज घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु आता संजय राऊत यांच्या पत्नीनं बँकेचे ५५ लाख रूपये परत केल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

“संजय राऊत म्हणाले त्यांच्या पत्नीनं पैसे परत केले आहेत. परंतु हिशोब तर द्यावाच लागणार. अखेर संजय राऊत यांना पैसे तर परत करावेच लागले. परंतु त्यांना हिशोबही द्यावाच लागेल,” असं किरीट सोमय्या म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांनी पैसे पर दिल्याने या प्रकरणाला पुर्णविराम लागला की पुन्हा चौकशीला बोलावले जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साहित्य संमेलन ऐतिहासिक होण्यासाठी उदगीरकरांनी झोकून देऊन काम करावे! –  संजय बनसोडे

Aprna

मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

News Desk

…म्हणून उध्दव ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांना नमस्कार!

News Desk