HW News Marathi
महाराष्ट्र

“४ महिन्यात ठाकरे सरकारचे ६ मंत्री सीबीआयच्या दारात असतील”, किरीट सोमय्या यांचा दावा!

मुंबई | फोन टॅपिंग प्रकरणी तपासात गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना समन्स बजावलं होतं. पण रश्मी शुक्ला यांनी आपण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचं एका पत्राच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना कळवलं होतं. परंतु, सीबीआयनं रश्मी शुक्ला यांचा जबाब अखेर नोंदवला आहे. सीबीआयच्या एका विशेष पथकानं हैदराबादला जाऊन रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याची माहिती मिळत आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

“उद्धव ठाकरे हे भयंकर भयभीत झाले आहेत. सीबीआयने रश्मी शुक्ला यांची जवाब सुरु केली आहे. एफआयआरमध्ये अनिल परब यांचेही नाव आहे. ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहे. ठाकरे सरकार परमवीर सिंग, रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणत आहे. मात्र ठाकरे यांना माझा खुले चॅलेंज आहे की येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळातील सहा सहकारी सीबीआरच्या दारात असलीत, असे खुले आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.

आज कल्याणमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पाहणी दौरा होता. या दरम्यान खाजगी आणि सरकारी कोवीड रुग्णालयांची पाहणी केली. या संदर्भात आयुक्त विजय सूर्यवंशी यांची चर्चा केली. महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ऑक्सीजन मिळत आहे. मात्र खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजन मिळत नसल्याने खाजगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रवेश घेणो बंद केले आहे. त्याचबरोबर महापालिका हद्दीत रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मागणीच्या तुलनेत केवळ २० टक्केच रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहे. ही स्थिती राहिलील्यास १५ मे नंतर एमएमआर रिजनमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढणार असल्याची धोका सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मराठा आरक्षणाचा खरा ‘टक्का’ कोण सांगेल आणि देईल?”, पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल

News Desk

भीमा-कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेतले, गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

swarit

अर्णब गोस्वामी यांना यूके’च्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाखांचा दंड ठोठावला

News Desk