HW News Marathi
महाराष्ट्र

‘किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्ला!’

पुणे | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना राज्यात यापूर्वी ईडीच्या एवढ्या कारवाया बघायला मिळाल्या होत्या का? असा सवाल करत केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच मुद्द्यांवरून शरद पवारांवर टीकास्र सोडले आहे.

एखादी खासदार व्यक्ती ११८ कोटी एवढी मोठी रक्कम बँकेतून काढते कसे? शरद पवार तुम्ही गवळींना वाचवत आहात. गवळी यांना वाचवायचं असेल तर पवारांनी तसं स्पष्ट सांगावं. मात्र, शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रं दिली अन् मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी मी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणारच आहे अशा शब्दात सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

आगे आगे देखो होता है क्या?

किरीट सोमय्या आज(९ सप्टेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेत होते, त्यावेळी बोलताना त्यांनी छगन भूजबळांच्या सुटकेविषयी भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी अधिक काहीही न बोलता आगे आगे देखो होता है क्या? एवढंच उत्तर देणं पसंत केलं आहे.

भाजपचा आरोप आणि भावना गवळींच्या संस्थांवर ईडीची कारवाई

यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपने केला होता. या तक्रारीनंतर यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने कारवाई केली होती. ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्त केल्याबद्दल विचारलं असता किरीट सोमय्यांनी आगे आगे देखो होता है क्या, असं शायरीतूनचं उत्तर दिलं. कितीही अटॅक करा, मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असंही सोमय्या म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत

Aprna

देवाच्या व धर्माच्या नावावर भाजपाकडून जनतेची लूट! – अतुल लोंढे

Aprna

वाशिम जिल्ह्यात उघड्यावर शौचास बसल्यास बॅड मार्निंग होईल  

News Desk