HW News Marathi
महाराष्ट्र

राऊत कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहाराची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे, किरिट सोमय्यांची मागणी 

मुंबई | पीएमसी बँकेप्रकरणातील आर्थिक व्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे संजय राऊत अडचणीत आलेले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा राऊत कुटुंबाच्याच चौकशीची मागणी केली आहे. राऊत कुटुंबातील काही सदस्यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

“एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५४०० कोटी रुपये ढापले आहेत. एचडीआयल आणि प्रवीण राऊत कुटुंबाचे कोट्यवधीचे आर्थिक संबंध आणि व्यवहार आहेत. तसेच प्रवीण राऊत आणि संजय राऊतांच्या कुटुंबाचेही आर्थिक संबंध आहेत. या दोन्ही राऊत कुटुंबांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा आला कुठून? या दोन्ही कुटुंबांच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी झाली पाहिजे. पीएमसी बँकेचा पैसा एचडीआयएल मार्गे कुठून कसा गेला? याचीही चौकशी झाली पाहिजे,” असं सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी या ट्विटमधून माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची, ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व सातबारा मिळणार डिजिटल स्वाक्षरीने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक घोटाळ्याला क्लिन चिट | धनंजय मुंडे

News Desk

तोरंगणा घाटात २५ फूट खोल दरीत खासगी बस कोसळली

News Desk