HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊन हवा की नको ? लोकांनीच ठरवावं ! – मुंबई महापौर

मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून गेल्या २ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यानंतर आता मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील आज (१६ फेब्रुवारी) कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

किशोरी पेडणेकर याबाबत माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “वाढती कोरोना रुग्णसंख्या ही चिंतेचीच बाब आहे. अनेक लोक मास्कविना लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकांनी याबाबत खबरदारी घ्यायला हवी नाहीतर आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाऊ. त्यामुळे लॉकडाऊन लागू व्हावा की नाही?, हे आता सर्वस्वी लोकांच्याच आहे”, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर वाढला असून कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्क्यांवर पोहोचले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका प्रशासनाला चेंबूरमधील एका वार्डात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे, राज्यासह मुंबईत देखील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

‘या’ वॉर्डात लॉकडाऊनची शक्यता

चेंबूरमधील एम-पश्चिम वॉर्डकडून सोसायटी आणि फेरीवाल्यांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या विभागात लॉकडाऊनची देखील शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी याच वॉर्डमध्ये दिवसाला १५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र, आता हे प्रमाण २५ हुन अधिक झाले आहे. या वॉर्डात दर दिवशीचा रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात आजपासून काय सुरु का बंद? जाणून घ्या…

News Desk

पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

News Desk

अमरावतीत लॉकडाऊन आणखी ७ दिवसांसाठी वाढवला

News Desk