HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेने कोविड सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकरांनी फेटाळला

मुंबई | आपल्या मुलाला कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर केला असा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केला होता. मात्र, मनसेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खंडन केले आहे. ही कंपनी २०११ सालीच स्थापन झाली होती, जी महापालिकेची व्हेंडरही आहे. रितसर प्रक्रिया पूर्ण करून सगळ्यात कमी किंमतीला कोटेशन देऊन काम त्या कंपनीने मिळवले आहे. माझा मुलगा त्या कंपनीत पार्टनर आहे, मी ते नाकारत नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. महापौर असल्यामुळे आपले नाव बदनाम करण्याचे काम केले जात आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मनसेने केलेले भ्रष्टाचाराचे सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड आणि जम्बो सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसंच महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर करून स्वतः च्या मुलाच्या कंपनीला काम मिळवून दिले. साईप्रसाद किशोर पेडणेकर यांच्या कंपनीने गैरमार्गाने हे काम मिळवल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. आपण केलेला भ्रष्टाचार समोर येऊ नये यासाठी महानगरपालिका सभागृह चालू केले जात नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महानगरपालिका बंद का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिसोड येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मोर्चा

News Desk

मुंबईत ‘कोरोना’चा एकही रुग्ण, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका !

swarit

पवारांनी राज्यातील भीषण दुष्काळावर मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

News Desk