HW News Marathi
महाराष्ट्र

“आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका” महापौरांचा इशारा !

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय आहे. यावरून त्यांना विरोधकांच्या टीकांना सामोरं जावा लागत आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वक्तव्य केलं होतं. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करायचा नाही, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात

राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांना झुगारून मनसे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दही हंड्या फोडल्या आहेत. यावर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे. राजकिय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे. हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

‘त्या´ नेत्याचे अश्रू हे ‘मगरमच्छ के आंसू´

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या व्हायरल व्हिडिओवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसेच्या एका नेत्याचा कोव्हिडच्या आधीच्या लाटेतला रडतानाचा व्हिडीओ मला अनेकांनी दाखवला. तेव्हा हे रडत होते. आता हे दहिहंडीसाठी लोकांना गर्दी करण्याकरता उकसवत आहेत. यांचं तेव्हाच वागणं खरं की आताचं वागणं खरं हे समजत नाही. मनसेच्या ‘त्या´ नेत्याचे अश्रू हे ‘मगरमच्छ के आंसू´ समजायचे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

मार्शल अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं

मास्कशिवाय फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली नाही म्हणून मार्शल अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मुंबईत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य कारवाई करा, असे आदेशच त्यांनी या मार्शलना दिले. फोनवरूनच त्यांनी या मार्शल अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. विशेषत: इमारती सील करण्याच्या मोहिमेवर आमचं लक्ष आहे. पाच माणसांना कोरोनाची लागण झालेलं आढळल्यास ती इमारत किंवा सोसायटी सील करण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मार्शलवरही कारवाई करण्यात येणार

मास्क न घालता फिरणारे अनेक लोक हुज्जत घालत असतात. अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्या मार्शल विरोधात तक्रारी आल्यास अशा क्लिनअप मार्शलवरही कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक क्लिनअप मार्शलची आणि वॉर्डाची ओळख दर्शवणारा ठळक क्रमांक गणवेशावर देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनाही तक्रार करणे शक्य होणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे ‘हा’ महाराष्ट्राचा अपमान! – नाना पटोले

Aprna

खासदार संभाजीराजेंची मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची घोषणा !

News Desk

काहीजण एवढी कागदपत्रे दाखवून घोटाळ्याचा आरोप करतात, अजित पवारांचा सोमय्यांवर निशाणा!

News Desk