HW News Marathi
महाराष्ट्र

रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास 8 वर्षांपूर्वी भाजपचा होकार, महापौरांनी पाठिंब्याचं दाखवलं पत्र!

मुंबई | गोवंडी येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने विरोध दर्शवित महापौरांकडे दाद मागितली आहे. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला त्याचं एक जुनं पत्र दाखवलं आहे. प्रत्यक्षात 2013 मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे.

राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड

राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड सुरू असल्याचा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. गोवंडी, कचराभूमी येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत बाजार उद्यान समितीच्या सभेचा भाजप सदस्यांनी त्याग केला होता.

महापौर किशोरी पेडणेकरांनी पाठिंब्याचं लेटरच दाखवलं!

गोवंडी, बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून रफीक नाल्यापर्यंतच्या मार्गाला तत्कालीन अपक्ष नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी ‘टिपू सुलतान’ नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीला भाजप सदस्याने अनुमोदन दिले होते. त्यामुळे भाजप नगरसेवकांकडून शिवसेनेला नाहक बदनाम करण्यासाठीच आरोप केले जात असल्याचे महापौरांनी सांगितले. 2013 मध्ये स्थापत्य समितीत मंजुरीसाठी मांडलेल्या, भाजपचा पाठिंबा असलेल्या प्रस्तावाची प्रतच त्यांनी दाखविली आहे.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग भाजप देत आहे. भाजपच्याच पाठिंब्याने मुंबईत या आधीही काही ठिकाणी ‘टिपू सुलतान’ नाव देण्यात आले आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने केली. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी या संदर्भात मागणी केली होती. त्या मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. 136 मधून नगरसेविका आहेत. प्रभागातील साहीनाका डम्पिंग रोड येथील पालिका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याबाबत रुक्साना सिद्दीकी यांनी मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात आग

swarit

10 जानेवारी रोजी “महाराष्ट्र बंद” नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. – मराठा क्रांती मोर्चा

News Desk

‘भाजपवाल्यांचा कोणत्या अभिनेत्रींशी संबंध आहे हे उघड करायला आम्हाला आव्हान देऊ नये’ – मलिक

Manasi Devkar