HW News Marathi
महाराष्ट्र

महाभारतात जसे शिखंडी होते, तसं किरीट सोमय्या हे शिखंडीच्या भूमिकेत, महापौरांची गंभीर टीका

मुंबई | ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये अन्वय नाईक कुटुंबावरुन वाद सुरु झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी नाईकांकडून जमीन घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन शिवसेनेडून सोमय्यावर जोरदार टीका केली जात आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

“महाभारतात जसे शिखंडी होते, तसं भाजपाचे किरीट सोमय्या हे शिखंडीच्या भूमिकेत आहेत. दोन गोष्टी आता लोकांच्या लक्षात आल्या आहेत. आता फ्रॉड हा शब्द बोलायचा नाही. या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमय्या. हे आता प्रचलित धोरण झालं आहे,” असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली. किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत आणि फक्त साडी नेसवणं बाकी आहे. तेदेखील आम्ही करू असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

वारंवार तक्रारी करत राहायच्या, श्वानासारखा आवाज करत राहायचं आणि लोकांना केवळ डिस्टर्ब करत राहायचं हे सोमय्या यांचं काम असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. “किरीट सोमय्या करत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत हे कायम आम्ही सांगत आलो आहोत. आम्ही कायम त्या शिखंडींना आव्हान स्वीकारून ते सिद्ध करण्यासही सांगत आहोत. सिद्ध झाल्यास कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत. याचा अर्थ त्यांनी कायम आरोप करावे आणि आम्ही आमचा कामधंदा सोडून त्यांच्यामागे आम्ही बोलायला जावं तर ते आम्ही करणार नाही,” असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

“कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही काम केलंय असं जर तुम्हाला वाटत असेल आणि ते सिद्ध झालं,तर कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत. शिखंडीची भूमिका करून ते केवळ साडी नेसायचे बाकी आहेत. तीदेखील आम्ही नेसवून टाकू. मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, महापौर म्हणून मी चांगलं काम करत आहे तर उगाच डिस्टर्ब करत राहायचं. मंत्रीमहोदयांना डिस्टर्ब करत राहायची कामं सुरू आहेत,” असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaHearing : अयोध्या सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षांच्या वकीलाने फाडला नकाशा

News Desk

गोहत्याबंदीबाबत फेरविचार शक्य – माधव भांडारी

News Desk

फडणवीस,प्रवचने झाडणे बंद करा आता ! सामनातून टोला…

News Desk