HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार ?

मुंबई। राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी महाविकासआघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची काल (२६ नोव्हेंबर) घोषणा झाली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार यांची उत्सुकता सर्वांच लागली आहे. उद्धव ठाकरे हे विधानसभा की विधान परिषदेचा मार्ग निवडणार यासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदासाठी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व असणे बंधनकारक आहे. मात्र, उद्धव ठाकरे सध्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. उद्धव ठाकरेंना पुढील सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोणत्या मतदारसंघा हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. उद्धव ठाकरेंसाठी माहिम, दादर आणि प्रभादेवी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

तसेच शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असणारे शिवाजी पार्क याच मतदारसंघात येते. त्यामुळे दादर, प्रभादेवी आणि माहिम परिसराचा समावेश असणारा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या शिवसेनेचे सदा सरवणकर येथील आमदार आहेत. विशेष म्हणजे, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाचा शोध सुरू होता. तेव्हा देखील माहिमचाही विचार करण्यात आला होता.

विधान परिषेदतून निवडणूक लढविण्याची शक्यता

आदित्य यांच्यासाठी वरळीतील तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांना जागा सोडावी लागली होती. आता, उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचा मार्ग पत्करल्यास एखाद्या विद्यमान आमदाराला राजीनामा देत जागा रिकामी करावी लागेल. माहिम, शिवडीसह किमान बारा ते सोळा मतदारसंघ शिवसेनेसाठी अगदीच अनुकूल गटात मोडणारे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळही पुरेसे असल्याने परिषदेची वाट तुलनेने सोपी ठरणार आहे. त्यामुळे विधान परिषदेला पसंती दिली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या एक दिग्गज नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात हस्तक्षेप करा; आमदार गोपीचंद पडळकरांची यांची राज्यपालांकडे विनंती!

News Desk

कंगनाला न्यायालयाचा धक्का, नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले

News Desk