मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ एप्रिल) देशातील लॉकडाऊनची कालावधी वाढून ३ मेपर्यंत केला आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे मुंबईतील परराज्यातील कामगार, मजूर यांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. लॉकडाऊनमुळे आपल्या मूळ गावी जाता आले नाही. यामुळे यावेळी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झालेली पाहायला मिळलाी आहे.
Mumbai: A large group of migrant labourers gathered in Bandra, demanding for permission to return to their native states. They later dispersed after police and local leaders intervened and asked them to vacate. pic.twitter.com/uKdyUXzmnJ
— ANI (@ANI) April 14, 2020
लॉकडाऊनमुळे सर्वच प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीपासूनच परराज्यातून रोजगारासाठी मुंबईत आलेले हजारो मजूर मुंबईत अडकून पडलले आहेत. आज मध्यरात्रीनंतर किमान राज्यांच्या सीमा खुल्या होतील आणि या परराज्यातील कामगारांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळेल, अशी आशा त्यांना वाटत होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे मोदींनी आज देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवला. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने घाबरलेल्या लोकांनी आज सायंकाळी ४ वाजताच्या सामुरा वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. परराज्यातील कामगारांनी मूळगावी जाण्यासाठी आग्रह धरला होता. या प्रकरणावर राज्यातील राजकीय सत्तधाऱ्यांनी केंद्रावर तर विरोधकांनी राज्य सरकारवर ट्वीटरवरुन टीका केली आहे.
The current situation at Bandra Station, now dispersed or even the rioting in Surat is a result of the Union Govt not being able to take a call on arranging a way back home for migrant labour. They don’t want food or shelter, they want to go back home
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 14, 2020
“वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती ही सूरतमधील दंगलसारखी वाटते आहे. या संपूर्ण परिस्थितीला केंद्र सरकाराल जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरद्वारे केला. आदित्या ठाकरे पुढे म्हणाले की, परराज्यातून आलेल्या कामगारांना अन्न-पाणी किंवा निवारा नको आहे, त्यांना घरी परतायचे आहे. कामगारांची घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास केंद्र सरकार सक्षम नसल्याचाच हा परिणाम आहे,” असे म्हणत केंद्रावर टीका केली आहे.
अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे.#Mumbai #Bandra
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2020
आदित्य ठाकरे यांच्या टीकेला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीटद्वारे उत्तर देत राज्य सरकारवर टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, “अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे.”
तळहातावर ज्यांचे पोट आहे त्याला #मोफतजेवण आणि #धान्य याची वेळीच व्यवस्था झाले असते तर ..आज बांद्रा मध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे ती टाळता आली नसती का ? पोटाला अन्न नाही आणि साधा सर्दी-खोकला झाला तर तपासायला आजूबाजूला दवाखाने बंद ? शेवटी कंटाळून माणूस करणार काय ? @OfficeofUT pic.twitter.com/eydJeFImL4
— Ram Kadam (@ramkadam) April 14, 2020
भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “तळहातावर ज्यांचे पोट आहे त्याला #मोफतजेवण आणि #धान्य याची वेळीच व्यवस्था झाले असते तर ..आज बांद्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे ती टाळता आली नसती का ? पोटाला अन्न नाही आणि साधा सर्दी-खोकला झाला तर तपासायला आजूबाजूला दवाखाने बंद ? शेवटी कंटाळून माणूस करणार काय ?
मुख्यमंत्री सतत बोलत आहे जिथे आहात तिथेच रहा सरकार तुमची काळजी घेईल..
अस होत नाही आहे म्हणुनच उद्रेक होत आहे!!— nitesh rane (@NiteshNRane) April 14, 2020
” “मुख्यमंत्री सतत बोलत आहे जिथे आहात तिथेच राहा, सरकार तुमची काळजी घेईल.. असं होत नाही आहे म्हणुनच उद्रेक होत आहे!!”, असे भाजपचे आमदार निलेश राणे ट्वीटमध्ये म्हणाले. राणेंनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी lockdown आधीच 30 एप्रिलपर्यंत वाढवला होता ..केंद्राने आज केले! पर्यटन मंत्र्यांनी आपल्याच घरी विचारले असते आणि pm च्या conference मध्ये मोबाईल खेळत बसले नसते तर आज केंद्रावर बोट दाखवले नसते!.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.