HW News Marathi
महाराष्ट्र

माहिती आणि प्रसारण खाते मिळालेल्या प्रकाश जावडेकरांबद्दल या गोष्टी जाणून घ्या

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. जावडेकर यांचा जन्म ३० जानेवारी १९५१ रोजी पुण्यात झाला. जावडेकर यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. जावडेकर यांचे महाविद्यालयीन जीवन तसेच राजकीय सुरूवात पुण्यातूनच झाली. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. १९७१ ते १९८१ दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली.

१९८१ मध्ये महाराष्ट्र बँकेचा राजीनामा देऊन पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारमध्ये मानव संसाधन मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे जावडेकर हे एक लोभस व्यक्तिमत्त्व असल्याचे बोलले जाते. पुणेकर असलेले जावडेकर हे गेली कित्येक वर्षे भाजपा, जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कायकर्ते आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला.जावडेकर यांनी पुणे विभागातून दोन वेळा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. ते महाराष्ट्र सरकारच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते.

जावडेकरांनी महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी अनेक वर्षे सांभाळल्यानंतर त्यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले. आणि केंद्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. तब्बल तीन निवडणुकांमध्ये त्यांनी पक्ष प्रवक्त्याची जबाबदारी सांभाळली. २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती नभोवाणी खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. मनुष्यबळ विकास खाते सांभाळतांना त्यांनी शिक्षणात अमुलाग्र बदलही केला. यावरुन त्यांच्यावर टिकाही झाली होती.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुयारी गटार योजनेस राज्य शासनाची मंजूरी

News Desk

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार

News Desk

स्मशानभूमीतला दिव्य विवाह सोहळा

News Desk