HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्रातील ७ मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (३० मे) ५७ मंत्र्यांनी शपत घेतली होती. यानंतर मोदींच्या दुसऱ्या पर्वाचा आरंभ झाला असून यात नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज (३१ मे) जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील सात शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या वाटेला ४ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदे मिळाली आहे.

मोदी सरकारने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्री पद देण्यात आले आहे. तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री आणि निर्मला सीतारमन यांना अर्थ मंत्री पद देण्यात आले आहे. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील मंत्रिमंडळामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे या खात्याची जबाबदारी

  • नितीन गडकरी – भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
  • प्रकाश जावडेकर – पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण
  • पियुष गोयल – रेल्वे, वाणिज्य उद्योग
  • अरविंद सावंत – अवजड उद्योग
  • रावसाहेब दानवे – ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा
  • संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
  • रामदास आठवले – सामाजिक न्याय

 

Related posts

मोदी देशवासीयांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही | राहुल गांधी

swarit

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

News Desk

ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेस अध्यक्ष करा, मध्ये प्रदेशमध्ये बॅनरबाजी

News Desk