मुंबई | विधनसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज (२८ फेब्रुवारी) ओबीसीची जातीनिहाय जनगणना प्रस्तवा सभागृहाच्या पटलावर मांडले. “बिहारच्या धरर्तीवर ओबीसी समाजाची जनगणना वेगळी व्हावी,” अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात केली. यावेळी ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी, या मागणीला सभागृहात विधानसभेचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिला. विरोधकांनी ओबीसी समाजाच्या जनगणना दिलेल्या समर्थनाने सर्व सभागृह अचंबित झाले.
राज्याचे विधानसेभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून अधिवशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी ठाकरे सरकार विरोधात विधीमंडळाच्या पाऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. सभागृहात गोंधळ घालत कामकाजामध्ये व्यत्यय आणणे, विरोधकांच्या या प्रकारामुळे अनेकदा सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले तरी काही वेळेला सभागृह स्थगित करण्यात आले.
ओबीसी समाजाची जनगणना वेगळी व्हावी | छगन भुजबळ
बिहार विधानसभेने ओबीसीची जातीनिहाय जनगणना प्रस्तवा एकमताने मंजूर केला आणि तो केंद्रकडे पाठविला, यांची माहिती कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात उपस्थितांना दिली. १९३१ झाली देखील ऐवढ्या जाती होत्या. त्यावेळी देखील जात गगनणना करत होते. आता आपल्याकडे मनुष्य बळ जास्त आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जातीनिहाय जनगणना शक्य असल्याचेही भुजबळांनी सांगितले. सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची आपली प्रथा आहे. १९९० पासून ओबीसी समाजाच्या जनगणेची मागणी होतेय, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव दिला होता, अनेक मुख्यमंत्र्यांनीही प्रस्ताव दिला होता, त्यावर नरेंद्र मोदींची सही होती, देशात ५४ टक्के ओबीसींची संख्या आहे, त्यामुळे ओबीसी जनगणना होणे आवाश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
ओबीसी समाजाची जनगणना वेगळी समर्थन | फडणवीस
ओबीसीची जातीनिहाय जनगणना प्रस्तवा आमचे समर्थन असल्याचे विधानस सभेचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. ओबीसीची जनगणनाही आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपण पंतप्रधानांना जाऊन भेटू या, आणि त्यांना सर्वांनी विनंती केली पाहिजे, असे ते म्हणाले.
जाता जात नाही तिला जात म्हणतात | आव्हाड
जगामध्ये कुठेही आरक्षण नसताना छत्रपती शाहू महाराजांनी समता आणि बधुंत्व जगभराला शिकविले, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात सांगितले. आणि पहिल्यांदा राज्यातील महागास वर्गींयांना व्यवस्थेमध्ये आणले. ज्या कारणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थांनी राजीनामा दिला. मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकलो. पण इतर समाजाला मी न्याय देऊ शकलो नाही, म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. आजचे ओबीसीला मंडळाच्या माध्यमातून आरक्षण मिळाले याचे खरे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंडेबकरच आहेत. इतर मागासवर्गीयांची पदोन्नतीची फाईल गेल्या चार वर्षापासून मंत्रलयात फिरते. जाता जात नाही तिला जात म्हणतात, त्या जातिचा अभिमान असलेला मी कार्यकर्ता आहे.
सर्व नेत्यांची ओबीसीची जनगणना व्हावी हिच इच्छा | वडेट्टीवार
देशातील सर्व नेत्यांचे वेगवेगळ्यात ओबीसीची जनगणना व्हावी हिच इच्छा आहे. ओबीसीमधील ८० टक्के लोकांना पदोन्नती मिळालेली नाही, असेही कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही सभागृहात सांगितले. या समाजाला आणि प्रवर्गाला न्याय देण्यासाठी काही तरी निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.