HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या…मतदानाला जाताना कोणती ओळखपत्र सोबत घ्यावी

मुंबई | राज्याची (२१ ऑक्टोबर) १४वी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. एक लोकशाहीवादी देश असल्याने भारतात निवडणुकांना मोठे महत्त्व आहे. मतदानाचा हक्क बजावण्याची सर्वात मोठी जबाबदारी नागरिकांची आहे. यासाठी नागरिकांनी सज्ज झाले आहेत. मतदारांना मतदान करताना या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यात मतदान करण्यासाठी जाताना मतदारांनी ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र नसलेल्या मतदारांसाठी काही पर्याय दिले आहे. त्यामुळे मतदान ओळखपत्र नसले तरी त्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.

मतदान करताना मतदाराकडे पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असे अशा बारा ओळखपत्राद्वारे तुम्हाला मतदान करता येणार आहे. मतदानकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसह छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असेलेल बँकांचे किंवा टपाल कार्यालयाचे ओळखपत्र, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकाद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड ही आवश्यक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे या ग्राह्य ओळखपत्रांच्या आधारे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

मतदार यादी तुमचे नाव असे बघा

याव्यतिरिक्त, मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही. हे पाहण्यासाठी आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. मतदार यादी तुमचे नाव आहे, का हे तुम्ही घर बसल्या पाहू शकता आणि ते ही एका क्लिकवर तुम्ही सर्व माहिती मिळणार आहे. यासाठी  यासाठी निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती उपलब्ध होईल.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान होणार आहे. सबंध २८८ जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी एक लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि एक लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट सज्ज करण्यात आली आहेत. शिवाय, एक लाख ३५ हजार २१ व्हीव्हीपीएटी (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सुनलो हमारी बात…” आमदार बच्चू कडूंचे पावसात सरकारविरोधी आंदोलन

News Desk

मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण म्हणजे केवळ पोकळ घोषणा, विनायक मेटेंचा वार

News Desk

शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन 

News Desk