HW News Marathi
महाराष्ट्र

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांची दणक्याने सुरूवात,सुजित मिणचेकर विजयी !

कोल्हापूर | संपुर्ण महाराष्ट्रात लक्ष लागून राहिलेल्या गोकुळचा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. जवळजवळ २५०० कोटींची उलाढाल असणाऱ्या गोकुळची निवडणुक यंदा अधिक चर्चेत आहे कारण महाविकासआघाडीचे आमदार,खासदार एकत्रितपणे कामाला लागले आहेत.

सतेज पाटील विरूद्ध महादेव महाडिक असा सामना असताना गोकुळ दूधसंघ कोणाच्यातरी हातात जाणार याचा निकाल आज लागणार आहे.मतमोजणीला सुरूवात झाली आहे आणि पहिला निकाल हाती आला आहे. सतेज पाटील गटाचे उमेदवार आणि माजी आमदार सुजित मिणचेकर 346 मतांनी विजयी झाले आहेत.

सत्ताधारी महाडिक-पीएन पाटील गटाची धाकधूक सध्या चांगलीचं वाढली आहे. सध्या राखीव प्रवर्गातील दोन फेऱ्यांची मतमोजणी झाली असून, अजून दोन फेऱ्या होणार आहेत. राखीव गटातील मतमोजणी झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील मतमोजणीला सुरुवात होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण मग आम्ही भिकारी आहोत का? – नितीन राऊत

News Desk

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

Aprna

“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे” फडणवीसांची खोचक टीका

News Desk