HW News Marathi
महाराष्ट्र

Kolhapur Elections: कोल्हापुरचं मैदान कोण मारणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

कोल्हापूर | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा आज (शनिवार, १६ एप्रिल) निकाल लागणार आहे. अत्यंत चुरशीची ठरलेली ही लढत कोण जिंकणार? अखेर कोण बाजी मारणार? कुठला राजकीय पक्ष कोल्हापुरात आपली सत्ता काबीज करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अनेक बड्या नेत्या प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्या आहेत. खरंतर या निवडणुकीच्या रिंगणात पंधरा उमेदवार होते. मात्र, तरी देखील खरी लढत ही भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम आणि कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यात आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी असे दोन्ही पक्षातील बडे नेते या निवडणुकीत अधिक लक्ष घालत असल्याचे पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर आज कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?’, शेलारांनी व्यक्त केली भीती

News Desk

“पवारसाहेब तुम्ही दारुवाल्यांसाठी पत्र लिहिलं, शेतकऱ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा ना”, भाजपची मागणी

News Desk

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बोलावली बैठक

News Desk