कोल्हापूर | राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. आज (४ मे) सकाळी ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. १८ टेबलांवर ३६३९ मते मोजली जाणार आहेत. प्रत्यक्ष मतमोजणीला १० वाजता अखेर सुरुवात झाली आहे. त्यानंतर काही तासांत हा निकाल लागण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीचा निकालाला विलंब लागत असला तरी विरोधकांच्या राखीव गटातील सर्व जागा ३० ते ६५ मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीला प्रारंभ झाला असून काही मिनिटांत निकाल जाहीर होणार आहे. ३६३९ पैकी ४५० मतांची मोजणी झाली आहेत.
मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि प्रतिनिधींना प्रवेश दिला जात आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात जोरदार चुरस असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. रमणमळा बहुउद्देशीय हॉलमध्ये ही मतमोजणी सुरू असून येथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
१८ टेबलांवर ३६३९ मते मोजली जाणार आहेत. मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि प्रतिनिधींना प्रवेश दिला जात आहे. गृहमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात जोरदार चुरस असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने याची उत्कंठा लागली आहे. रमणमळा बहुउद्देशीय हॉलमध्ये ही मतमोजणी सुरू असून येथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २ मे रोजी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही गटांनी प्रचंड ताकद लावल्याने निकालाची उत्कंठा लागली आहे. २१ जागांसाठी दोन्ही गटांचे ४५ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतपत्रिका वेगळ्या करून त्या विभागनिहाय एकत्र केल्या आहेत.
इतर मागासवर्गीय मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक दहा ते बारा टेबलवर होणार आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक एक ते १५ वर होणार आहे. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १६ ते १८ वर होणार आहे. राखीव गटातील मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील मतमोजणीस सुरूवात होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.