HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरात एसटीचे महाराष्ट्रातील पहिले रेस्क्यू पथक, ३०० फूट खोल दरीत प्रात्यक्षिके

कोल्हापूर | ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने स्वतःची रेस्क्यू फोर्स तयार केली आहे. कोल्हापूर एस टी विभागाच्या पुढाकारातून अपघातग्रस्त एसटीतील प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळाची राज्यातील पहिली रेस्क्यू टीम कोल्हापूर विभागाच्या वतीने प्रवाशांच्या मदतीसाठी तयार झालेली आहे. एसटीच्या या रेस्क्यू फॉर्स आज कोल्हापूरच्या भुईबावडा या घाटातील ३०० फूट खोल दरीत थरारक प्रात्यक्षिके केली आहेत.

ग्रामीण भागातील दळणवळणाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे एसटी. एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन प्रवाशांना सेवा देते. ही सेवा बजावत असताना अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी आणि घाटात एसटीचे अपघात होत असतात. या अपघातात प्रवाशांना तात्काळ मदत व्हावी, जखमींना दवाखान्यापर्यंत लवकर पोचवले जावे, त्यांच्यावर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी कोल्हापूर एसटी विभागाच्या वतीने स्वतःची रेस्क्यू टीम तयार केली आहे.

कोल्हापूरचे विभाग नियंत्रक पलंगे यांच्या मार्गदर्शनातून आणि गिर्यारोहक असणारा एसटी चालक अमोल अवळेकर यांच्या पुढाकाराने कोल्हापूर विभागातील ११ आगारातून १५ कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना आपत्कालीन प्रशिक्षण देऊन ट्रेन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाची राज्यातील पहिली रेस्क्यू टीम कोल्हापूर विभागाच्या वतीने प्रवाशांच्या मदतीसाठी तयार झालेली आहे. त्यांनी आज कोल्हापूरच्या भुईबावडा घाटातील ३०० फूट खोल दरीत आपत्कालीन प्रत्यक्षिकांचा थरार करत सराव केला.

मूळचा एसटीचा चालक आणि स्वतःच गिर्यारोहक असलेल्या अमोल अवळेकर याने एसटीची स्वतःची रेस्क्यू टीम आपण तयार करू शकतो असा कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला. यासाठी अमोल यांनी कोल्हापूर विभागातील ११ आगारा मधून १५ सक्षम कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षणही दिले. आता ते सर्वजण स्वतः खोल दरीत उतरून प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोल्हापूर विभागाने तयार केलेल्या या राज्यातील पहिल्या रेस्क्यू टीम चा आदर्श घेऊन आता प्रत्येक विभागाने स्वतःची रेस्क्यू टीम बनवल्यास अपघात ग्रस्त प्रवाशांना अधिक लवकर आणि जलद मदत मिळण्यास याचा नक्कीच उपयोग होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच!– नरेंद मोदी

Aprna

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल !

News Desk

समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा महापालिकेचा दावा मात्र उद्या होणार फैसला…

News Desk