पुणे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात कोसळणाऱ्या मुसळधार पाऊस पाहता येत्या ७ आणि ८ ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सातारा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने पावसाचे प्रमाण वाढल्याची माहिती मिळते.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. तसेच येत्या ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर कोकण, गोवा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यात उमरगा ६० मिमी, निलंगा ३०मिमी, फुलंब्री-वैजापूर २० मिमी, औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, लोहारा, तुळजापूर, उदगीर १० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर विदर्भात अकोट, चिखलदरा, वर्धा येथे २० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.