HW News Marathi
क्राइम

“तीन जणांकडून आमच्या घराची रेकी, कुटुंबाला धोका”- क्रांती रेडकर

मुबई | काही लोकांनी तीन दिवसांपूर्वी आमच्या घराची रेकी केली आहे. आम्ही यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार आहोत, असा दावा क्रांती रेडकर-वानखेडे यांनी केला आहे.मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे यांनी दावा केला आहे की, त्यांचे पती समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात आहे. त्या म्हणाल्या की, काही लोकांनी तीन दिवसांपूर्वी आमच्या घराची रेकी केली आहे. आम्ही यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार आहोत.

त्यामुळे आम्हाला सुरक्षा मिळणं गरजेचं

तसेच, आमच्या कुटुंबाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला सुरक्षा मिळणं गरजेचं आहे, अशी मागणीही क्रांती रेडकर यांनी काल माध्यमांशी बोलताना केली. क्रूझ ड्रग प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून सातत्यानं होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेक लोकांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिकाच सुरु केली होती.

काही दिवसांपूर्वीच मलिकांनी दावा केला होता की, समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब मराठी नसून मुस्लिम आहेत. तसेच समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी प्रमाणपत्र सादर केली. दरम्यान, नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड येथे स्फोटकाचा अवैध साठा जप्त, दोघांना अटक

News Desk

टिप्पर – टाटा सुमोच्या धडकेत एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी

News Desk

केवळ सहा महिन्यांमध्ये भारतात ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ले

News Desk