HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

गावात कृषी अधिकारी, सहाय्यक येतात का? कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांची केली विचारपूस

मुंबई | शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी (७ फेब्रुवारी) नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. यानंतर या उपक्रमाची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषीमंत्र्यांनी केली असून आज (१४ फेब्रुवारी) त्यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडेअजंग-वडेलझोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतली. गावात कृषी अधिकारीकृषी सहाय्यक येतात काअशी विचारणाही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली.

शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषीमंत्री भुसेंनी सुरु केला असून कृषी सचिवआयुक्त यांनी १५ दिवसातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावाअशा सूचना केली आहेत. या भेटीत पीक नियोजनउत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावीअसेही भुसेंनी विभागाला सूचना दिल्या आहेत.

नागपूर येथील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करुन कृषीमंत्र्यांनी आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु केली. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजनाकांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी सहाय्यककृषी अधिकारी तुमच्याकडे येतात काअशी विचारणाही कृषीमंत्र्यांनी यावेळी केली. भुसेंनी दिवसभरात अजंग-वडेलझोडगे व माळमाथा भागातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला.

Related posts

युती झाली तर आम्ही किरीट सोमय्यांसाठी प्रचार करणार नाही !

News Desk

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणुका

News Desk

Budget 2019 : नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री 

News Desk