HW News Marathi
महाराष्ट्र

धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसाद यांना एनसीबीकडून अटक

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगल समोर आला आणि बॉलिवूडमधल्या कलाकारांची नावे समोर येऊ लागली.दरम्यान, ड्रग्सच्या या चौकशी दरम्यान धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद यंना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतरही झालेल्या चौकशीत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने अखेर २७ तासांच्या चौकशीनंतर क्षितीजला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

एनसीबीच्या टीमने काल (२४ सप्टेंबर) क्षितीजला चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर रात्री त्यांना ताब्यात घेतलं गेलं. जवळपास 27 तास त्याची कसून चौकशी केली गेली. त्यानंतर क्षितीजला अटक करण्यात आली आहे. क्षितीजने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुंबईत चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्याशिवाय क्षितीजच्या चौकशीदरम्यान त्याने अनेक मोठ्या नावांचाही खुलासा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत त्यामुळे…

News Desk

नारायण राणे यांचं जामिना नंतर पहिलं ट्विट! म्हणाले…..

News Desk

‘आईवरून शिवीगाळ करणारे भास्कर जाधवच’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

News Desk