मुंबई | सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात खटला दाखल होणार आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिले आहेत. रिपलब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भातली काही ट्विट्सही केली. ज्यानंतर पुण्यातल्या काही वकिलांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली. आता अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी कुणाल कामराविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Attorney General KK Venugopal grants consent for initiating criminal contempt against stand up comedian Kunal Kamra (in file photo), for his alleged derogatory tweets against a Supreme Court judge. pic.twitter.com/KNLNEp2Nhw
— ANI (@ANI) November 12, 2020
काय आहे प्रकरण?
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना हंगामी जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयावर गोस्वामी यांना जामीन न दिल्याबद्दल ताशेरे ओढले. दरम्यान सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केल्यानंतर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने काही वादग्रस्त ट्विट्स केली होती. यानंतर वकील रिझवान सिद्दीकी यांनी देशाच्या अॅटर्नी जनरल यांनी पत्र लिहीत अवमानना खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. याच प्रकरणात आता पुण्यातील दोन वकिलांनी थेट भारताच्या अॅटर्नी जनरलकडे यासंदर्भात तक्रार केली असून संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कुणालवर कारवाई करण्याची मागणी या वकिलांनी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.