HW News Marathi
Covid-19

राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा | दिलीप वळसे-पाटील

मुंबई | कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी रू.२००० रुपये एवढे अर्थसहाय्यत्यांच्या बँक खात्यात थेट DBT पध्दतीने जमा करण्याचा निर्णयराज्य शासनाने घेतला होता. यानुसार ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा झाल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार कालपर्यंत (२० मे) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ७,६७,००० नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांच्याखात्यात प्रत्येकी रू. २००० रुपये प्रमाणे १५३ कोटी ४० लक्ष एवढे अर्थसहाय्य जमा करण्यात आलेले आहे. लॉकडाऊन कालावधीतील विविध अडचणीमुळे ज्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्याचा तपशील जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त झालेला नाही तोही प्राप्त करून त्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्यातही अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या काळात फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल!

News Desk

कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत अशी इच्छा नव्हती, पण…! | मुख्यमंत्री

News Desk

पुण्यातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला !

News Desk