HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई | यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी न करता साजरा करा असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर लालबागचा राजा या मंडळाने पत्रकार परिषद घेत यंदाचा गणेशोत्सव वेगळ्या ढंगात साजरा करण्याची कल्पना आखली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत लालबागच्या राजाची मृर्ती विराजमान करण्यात येणार नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मा दान करण्यात येणार आहे. यासाठी मंडळाकडून आयोजन करण्यात येणार आहे.

Related posts

विद्युत नियामक आयोगाला राज ठाकरेंनी लिहिले पत्र

rasika shinde

बाप्पाच्या मुर्ती साकारण्यास सुरुवात , आदिवासी मुलांना रोजगार

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा !

News Desk