मुंबई | गेल्या काही दिवसांत मुंबईत सहा कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या घटना घडल्या असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करणारे पत्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नुकतेच कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयामधून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय विठ्ठल मोरे या वृद्धाचा मृतदेह बोरीवली रेल्वे स्टेशनजवळ सापडला. या घटनेनंतर सोमय्या यांनी लिहिलेल्या पत्रात कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याच्या सहा घटनांचा उल्लेख केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून रुग्णालयातून मृतदेह गायब होण्याच्या घटनांकडे लक्ष वेधण्याचा आणि दोषींवर कारवाई करण्याचा मागणी केली आहे.
Last few days, half dozen dead bodies of COVID patient's were GAYAB ( disappeared/misplaced) from BMC Hospitals. I wrote to Maharashtra Home & Health Ministers for Actions @mybmc @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @MumbaiPolice pic.twitter.com/haPQWKwUrX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 9, 2020
किरीट सोमय्या यांच्या बरोबरच भाजप आमदार राम कदम यांनीही आवाज उठवला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रात घाटकोपरच्या राजावाडीमधून मेहराज शेख या रुग्णाचा मृतदेह गायब झाला होता. शताब्दी रुग्णालयमधून विठ्ठल मोरे हे वृद्ध रुग्ण गायब झाले आणि त्यांचा मृतदेह बोरीवली स्टेशनजवळ सापडला. नायर रुग्णालयमधून मधुकर पवार यांचा मृतदेह गायब झाला होता. तर जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयामधून एका वृद्धाचा मृतदेह गायब झाला. सायनमधून ग्यांतीदेवी विश्वकर्मा या रुग्ण महिलेचा मृतदेह कुटुंबीयांना देण्याआधीच अंत्यसंस्कार केले गेले, असे सोमय्या यांनी पत्रात सांगतले आहे.
"Ye Kya Ho Raha Hai" Now Dead Body of 80 year old COVID Patient of Shatabdi Hospital Kandivali found on Platform of Borivali Station
"ये क्या हो रहा है" शताब्दी रुग्णालय कांदिवली येथील 80 वर्षांच्या कोरोना पेशंट चा मृतदेह आत्ता बोरिवली स्टेशन प्लॅटफॉर्मवर सापडला @Dev_Fadnavis— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.