HW News Marathi
महाराष्ट्र

“फडणवीसांनी केलेल्या सूचनांचा विचार करू!”, चर्चेनंतर परबांचे सूचक वक्तव्य

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. फडणवीसांच्या सूचनावर आम्ही विचार करू, असे सूचक विधान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर केले आहेत. कर्मचाऱ्यांशी वारंवार चर्चा करूनही संपावर तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर परबांनी आज (१८ नोव्हेंबर) फडणवीसांची भेट घेतली आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही परबांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यायला तयार आहोत. परंतु, केवळ प्रश्न बेसिक वेतनाचा आहे, तर तो चर्चा करून सोडवला जाईल, असेही परब म्हणालं. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, अशी परबांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना काल (१७ नोव्हेंबर) नोटीस पाठवण्यात आली होती. आणि ही नोटीसची वेळ संपली असून कर्मचारी कामावर येणार नसतील तर त्यांना २०१६-२०१७ आणि २०१९ च्या भरती प्रक्रियेतील वेटिंगवाल्यांचा विचार करावा लागेल, असे स्पष्ट संकेतही परबांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन  कार्यवाही केली असती तर…

News Desk

‘नव्या भारताचे पितामह’ अमृता फडणवीसांकडुन मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

News Desk

हे तर दारूप्रेमी सरकार!  : सचिन सावंत

News Desk