HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांबाबत सरकारची फसवणुकीची मालिका कायम !

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करू असा आरोप विधानसभेचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, “मात्र, सरकारने कर्जमाफी करताना अनेक अटी टाकण्यात तर शेतकऱ्यांबाबत सरकारची फसवणुकीची मालिका कायम असून आम्ही त्यांचा निषेध करतो,” असे फडणवीसांनी यांनी माध्यमांशी बोलतान केली. फडणवीस पुढे म्हणाले की, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. जनतेचा आक्रोश विधानसभेत पोहचवू, असेही फडणवीसांनी सांगितले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला. तसेच गेल्या काही दिवसांत राज्यात वाढलेल्या महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांवरून सरकारला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व भाजपच्या आमदारांनी विधीनभवनाच्या पाऱ्यावर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी देण्यात सुरुवात केली. यावेळी विरोधकांनी ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे’, ‘सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा सरकार विरोधी घोषणा दिल्या गेल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य नेत्यांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी

News Desk

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवणार! – अनिल परब

Aprna

राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यात शिवसेनेच्या मंत्र्याचा हस्तक्षेप?

News Desk