HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांचं ट्विटद्वारे शरद पवारांवर टीकास्त्र

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या विचारांना उजाळा दिला. यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत १४ ट्वीट केली आहेत. यात फडणवीसांनी काश्मीर फाईल्स, १९९३ चे मुंबईतील बॉम्बस्फोट, ‘हिंदू टेरर’, नवाब मलिकांची अटक त्यांचा संबंध दाऊद आणि इशरत जँहा निर्दोष आदी मुद्द्यांवर पवारांवर टीका केली. 

फडणवीस ट्वीटमध्ये म्हटले, “जातीय राजकारण करणे हाच शरद पवारांचा जुना रेकॉर्ड आहे. आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा होत आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जम्मू-काश्मीर विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० ला विरोध होता. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, मुंबईतील आझाद मैदाना लज्जास्पद घटना घडली होती. त्यावेळी अमर जवान ज्योतिची विटंबना झाली. त्यावेळी गृह विभागाची जबाबादरी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रझा आकादमीबाबत मावळपणा दाखवला असून या प्रकरणी फक्त मुंबई आयुक्त बददले.

देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये नेमके काय म्हणाले

  •  जातीय राजकारण करणे हाच शरद पवारांचा जुना रेकॉर्ड आहे.
  •   आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा होत आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जम्मू-काश्मीर विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० ला विरोध होता. 
  •  १२ मार्च १९९३ रोजी १२ साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण मुंबई हदरली होती. पंरतु, १३ बॉम्ब हा मुस्लिम परिसरात असल्याचे त्यांनी खोटे सांगितले. 
  •  कोणाला पराभूत करायचे ते अल्पसंख्याक ठरवतात, अशा वादग्रस्त वक्तव्यांना आपल्या देशाच्या राजकारणात काही स्थान आहे का?, असा सवाल फडणवीसांनी केला. 
  •  राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, मुंबईतील आझाद मैदाना लज्जास्पद घटना घडली होती. त्यावेळी अमर जवान ज्योतिची विटंबना झाली. त्यावेळी गृह विभागाची जबाबादरी सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रझा आकादमीबाबत मावळपणा दाखवला असून या प्रकरणी फक्त मुंबई आयुक्त बददले. 
  •  काश्मीर फाईल्ससंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वक्तव्य ऐकत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस हे राजकारण आणि जातीच्या ध्रुवीकरण करण्याच्या जुन्या ट्रॅक आहे.
  •  ‘हिंदू टेरर’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, याचा तुम्ही अंदाज बाधा
  •  आपल्या घटनेत तरतूद नसताना राज्यात मुस्लिम कोटा आणण्याची योगजा तयार केली गेली. मुस्लिम समाजाचे वॉट बँक मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार का घेतला?
  •  नवाब मलिकांना ईडीने अटक केल्यानंतर ते मुस्लिम असल्यामुळे त्यांचे नाव दाऊदशी जोडले जाते, असे वक्तव्य पवारांनी माध्यमांशी बोलताना केले. यावरून फडणवीसांनी त्यांना इशरत जँहा निर्दोष  आहेत इतकेच पवारांनी म्हटले नाहीत त्यांना मदतीचा हात पुढे केला. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा केंद्रसरकारवर घणाघात!

News Desk

रश्मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, एक जण ताब्यात

News Desk

“महापुरुषांना जातीवरून वाटू नका”, पंकजा मुंडेंनी वादग्रस्त वक्तव्या करणाऱ्यांना खडेबोल सुनावले

Aprna