मुंबई | “महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागुकरण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो “महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका,” असे ट्वीट करत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर टीका केली आहे. भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक बातमी ट्विट केली आहे. जतेंद्र आव्हाड ट्वीट, “महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागुकरण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो “महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका,” #रडी_चा_डाव असे हॅशटॅग दिले आहे. सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटचे राज्यात काय पडसाद उमटणार हे आता पाहावे लागेल.
महाराष्ट्रात #राष्ट्रपती_शासन लागुकरण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो
"महाराष्ट्र झोपला आहे" असे समजू नका#रडी_चा_डाव— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 20, 2020
सुब्रमण्यम स्वामी यांनी The Corona Crisis: President’s Rule, the only way out in Maharashtra?’ असे या बातमीचे शीर्षक आहे. एक बातमी ट्विट त्यांनी ट्वीट केली आहे. तर पुढे यावर आपले मत मांडताना सुब्रमण्यम स्वामी यांनी असे म्हटले आहे कि, “आताच योग्य वेळ आहे पुढे तशी वेळ येणार नाही. उद्धव ठाकरे आताच महाविकासआघाडी तोडा नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला उध्वस्त करून टाकतील.”
The Corona Crisis: President’s Rule, the only way out in Maharashtra? https://t.co/4KKOraQpw8 via @PGurus1 : My view: “Time is now or never: Uddhav break the alliance now otherwise NCP and Congress will destroy you by staged events”
— Subramanian Swamy (@Swamy39) May 20, 2020
दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांच्या ‘या’ ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपच्या केंद्रातील नेत्याने महाराष्ट्रातील राजकारणाबाबत उघडपणे मत व्यक्त केल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील भाजपचे नेते आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडून वारंवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली जात आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी महाराष्ट्र भाजपसह आता केंद्रही विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.