मुंबई। नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड हे पेशाने डॉक्टर आहेत. डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांनी मात्र नियम बाजूला ठेवत विमानात एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. इंडिगो एअरलाईन्स मध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकाराचा आपल्या फेसबुक पोस्ट मधून कथन केले आहे.
मंत्रिपदाचा बळेजाव बाजूला ठेवत
केंद्रीय मंत्री भागवत कराड हे 15 ऑक्टोबर रोजी विमानातून प्रवास करत असताना डॉ भागवत कराड यांच्या मागील बाजुच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. आणि त्यावेळी भागवत कराड यांनी पाहिले आणि त्याचवेळी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यानंतर त्यांनी आपले सगळे नियम आणि मंत्रिपदाचा बळेजाव बाजूला ठेवत आणि कोणत्याही प्रकारचा उशीर न करता या प्रवासाच्या मदतीला केंद्रीय मंत्री भागवत कराड धावून गेले. विमानात प्रवासादरम्यान हा घडलेला संपूर्ण प्रकार मात्र भागवत कराड यांनी फेसबुक पोस्ट करत सगळ्यांसमोर मांडला आहे.
केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची फेसबुक पोस्ट काय?
प्रवास कर्तव्यदक्षतेचा….. !!
काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट IndiGo मध्ये 12 A सीट वर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. ” एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ” संतांची हि शिकवन कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.