HW News Marathi
महाराष्ट्र

धर्मा पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई | प्रमोद पां. पाटिल

मुंबई | जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पाटील यांचा २८ जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते.

ज्या दिवशी धर्मा पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या विषयाचा पाठपुरावा करत होते. हॉस्पिटलमध्ये पाटील यांना योग्य पध्दतीने सोयीसुविधा मिळत आहेत का? या सर्व गोष्टींचा पाठपुरावा मनसेकडून करण्यात आला. धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्यांनी केलेला पत्रव्यवहार आणि सरकारला महिन्याभरापूर्वी दिलेला आत्महत्येचा इशारा या सर्व गोष्टी हेलावणाऱ्या होत्या.

त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा झाली. आज सकाळी जेव्हा धर्मा पाटील यांच्या मृत्यूची बातमी आली आणि मन विषण्ण झालं. तात्काळ पत्र लिहायला घेतलं “वरिष्ठ पोलीस निरीक्षक , मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे “. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या इशारा पत्राचा आधार घेऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत प्रशासनातील व राज्य सरकारच्या संबंधितांवर आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांनर कायद्यानुसार योग्यती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच पाटील यांच्या मृत्युनंतरही मनसे त्यांच्या वतीने हा लढा चालू ठेवणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तराखंडला १७,५०० कोटींची भेट!

Aprna

काबुल विमानतळाजवळ पुन्हा हल्ला; एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी!

News Desk

लोकाभिमुख पोलिसिंगचा उत्तम आदर्श म्हणजे डॉ. के. वेंकटेशम

News Desk