HW News Marathi
महाराष्ट्र

विधान परिषदेची रणधुमाळी

मुंबई | राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचे रणसंग्राम सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. कोकणात म्हणजे रायगड -रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात चुरशीची लढत दिसून येत आहे. तर या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाची नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण स्वाभिमान पक्ष शिवसेनेला मदत करणार नाही. याचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • नाशिकमध्ये तिरंगी लढत

नाशिक विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे व अपक्ष परवेज कोकणी अशी तिरंगी लढत होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे परवेज कोकणी यांच्यावर माघार घेण्यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता होती. परंतु कोकणी यांनी अजूनपर्यंत अर्ज मागे घेतला नाही.

  • उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात कुरघोडी

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आणि लातूर भाजपाचे नेते रमेश कराड यांना पक्षात आपली बाजू मांडणाऱ्या बहिणीशिवाय दुसरे कोणी नाही, असे म्हणत. त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून त्यांना लातूरमधून उमेदवारीचा अर्ज देखील भरला. पण, ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली माघार अनेक राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला करमणुकीची गुढी उभारली | राम कदम

News Desk

पुण्यात आग लागलेल्या रासायनिक कंपनीची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून पाहणी

News Desk

“उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची”, भाजपचा शरद पवारांना टोला

News Desk