HW News Marathi
मुंबई

पित्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला अद्दल घडविण्यासाठी अमदाराची अनोखी शक्कल

मुंबई : वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला मुंबईतील आमदाराने अद्दल घडविण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. वडिलांसह मुलाचा फोटो लावून ‘जन्मदात्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलाचा धिक्कार असो’ अशा शब्दात आमदार भारती लव्हेकर यांनी निषेध व्यक्त केला आहे. अंधेरीतील गजबजलेल्या लोखंडवाला सर्कलमध्ये हे पोस्टर लावण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी शंकर वाघमारेंनी लव्हेकरांना आपली आपबीती सांगितली. आपल्या मुलाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असून त्याने तिला घरात आसरा दिला आहे. आपण दोघांच्या संबंधांना विरोध करु आणि चारचौघात त्याच्या बाबात सांगू, या भीतीने दोघांनी मला घराबाहेर काढले, असा दावा वाघमारेंनी केला.

अंधेरीत राहणाऱ्या विकास वाघमारे या ४५ वर्षीय व्यक्तीने आठ वर्षांपूर्वी आपल्या वडिलांना घराबाहेर काढले होते. त्यामुळे ७२ वर्षांचे शंकर वाघमारे सध्या वर्सोव्यातील एका छोट्याशा मंदिरात राहतात. ही सर्व घटना एका वृत्तपत्रात छापून आला होता.

आमदार भारती लव्हेकरांनी वाघमारेंना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र दरम्यानच्या काळात मुलाच्या मनात लाज निर्माण करण्यासाठी लव्हेकरांनी हे पोस्टर लावले. वडिलांची माफी माग आणि त्यांना सन्मानाने घरी परत घेऊन ये, असा इशारा या पोस्टरवरुन देण्यात आला आहे. सध्या एकच पोस्टर लावले असून काही दिवसात विकास राहत असलेल्या सात बंगला परिसरातील चाळीबाहेर आणखी चार पोस्टर्स लावण्याचा मानस लव्हेकरांनी बोलून दाखवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रलंयकारी 29 ऑगस्ट

News Desk

पडसलगीकरांना पुन्हा मुदतवाढ नाही, मुंबईच्या नवीन सीपी पदी परमबीर की बर्वे ?

News Desk

पुणे रेल्वे टीसीने केली प्रवाश्याला मारहान

News Desk