HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राला बलशाली करूया; विजयादशमी-दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा

मुंबई | आज दसऱ्याचा सण (Dasara Festival) असून सर्व देशभरात उत्साहात दसरा साजरा होतो आहे. कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तर आज दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा सण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येवो, त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे या शुभेच्छा संदेशात असं म्हणाले आहेत की, विजयादशमी म्हणजे वाईटावर विजय मिळविल्याचा आनंदोत्सव. कोविडच्या बिकट संकटावर मात केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी हा आरोग्याचा विजयोत्सवच आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आता आपल्याला पुढे जायचे आहे. बलशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रातील प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालावी, अशी आकांक्षा आहे. या विकास पर्वातूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असा विश्वास आहे. या ध्यासपूर्तीसाठी आपण एकजूट करुया या आवाहनासह पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमी – दसरा सणाच्या मनापासून शुभेच्छा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारला अद्यापही सूर गवसलेला नाही, फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका

swarit

ती गेली …आणि खासदार उदयनराजे भोसलेही हळहळले…

News Desk

मी सोलापूर शहर मध्य मदरासंघातूनच निवडणूक लढणार | प्रणिती शिंदे

News Desk