मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्याने सिंग यांच्यावर केले गंभीर आरोप केले आहे.हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर करण्यात आला आहे.
या पोलीस अधिकाऱ्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले आहे. परमवीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून विविध गोष्टीत गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. पत्रात फक्त परमवीर सिंग यांच्यावर नाही तर त्यांच्या कुटुंबियांवर देखील आरोप केला आहे.
या पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रामध्ये परमबीर सिंह यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांवरही आरोप केले आहेत. भ्रष्टाचारात त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्या पत्नीचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. त्या ठिकाणी त्यांनी हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय करतो. त्या ठिकाणीही या भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवण्यात आल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यानं केला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवलं आहे. तसंच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागालादेखील पत्र पाठवण्यात आलं आहे. यापूर्वी मुंबईतील पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळं एकापाठोपाठ एकच्या आरोपांमुळं आता परमबीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.