सांगली / जळगाव | राज्यात बुधवार सांगली -मिरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात करण्यात आली होती. हे मतदान सायंकाळी ५.३० वाजेपर्यत सुरु ठेवण्यात आले होते. मात्र जनतेने कौल नेमका कोणाच्या बाजुने दिला? हे आज कळणार आहे.
जळगाव महानगरपालिकेमधून निवडणुकीसाठी एकुण ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात उतरले होते. ९ पक्षांनी ही निवडणूक लढवली. मात्र खरी लढत हि भारतीय जनता पक्ष व शिवसेने मध्ये आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून महानगरपालिका सुरेशदादा जैन यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आगामी काळात कोण सत्तेत येणार याकडे जळगाव कराचे विषेश लक्ष लागले आहे.
आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जळगाव महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबतची सर्वांची उत्सुकता सध्या शिगेला पोहचली आहे. सर्व मतमोजणी कर्मचारी व अधिका-यांना सकाळी आठ वाजेपूर्वीच मतमोजणीस्थळी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
LIVE UPDATE:
जळगाव
- भाजप ५७, शिवसेना १५ आणि इतर ३ जागांवर आघाडी
- भाजप ५७, शिवसेना १४ आणि इतर ४ जागांवर आघाडी
- भाजप ३४, शिवसेना २३ आणि इतर १ जागांवर आघाडीवर
- भाजप ३०, शिवसेना २२ जागांवर आघाडी
- भाजप ११, शिवसेना ७ जागी आघाडीवर
- भाजपला ७, शिवसेनेला ६ जागांवर आघाडी
- शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे विजयी
- शिवसेनेच्या जिजाबाई भापसे व गणेश सोनवणे विजयी
- मतमोजणी ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाकारला.
- मीडिया कक्षातून टीव्ही पहा आणि रिपोर्टींग करा, अशा सूचना दिल्या.
- पत्रकारांना मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश नाकारल्याने गोंधळ
- शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
- महापालिकेचा पहिला कल हाती, प्रभाग – १ : भाजप ३, शिवसेना २ जागी आघाडीवर
सांगली
- भाजप २३, काँग्रेस-राष्ट्रवादी २२, इतर २ आघाडीवर
- सांगली प्रभाग ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी
- नर्गिस सय्यद, मेनद्दीन बागवान, रजिया काजी आणि अथहर नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ विजयी उमेदवार
- प्रभाग ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी
- प्रभाग १५ मध्ये काँग्रेसचे मंगेश चव्हाण आणि फिरोज पठाण विजयी
- भाजपा ६, काँग्रेस ५, राष्ट्रवादी ५, अपक्ष १ जागा
- प्रभाग १५ चा निकाल जाहीर, काँग्रेस ३ तर राष्ट्रवादी १ जागी विजयी
- भाजप ७, काँग्रेस ६, राष्ट्रवादी ५, अपक्ष १ जागा
- भाजप ६, काँग्रेस ५, राष्ट्रवादी ५, अपक्ष १ जागा
- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ उमेदवार आघाडीवर, भाजपाचे ६ उमेदवार आघाडीवर
- महापालिकेचा पहिला कल हाती, काँग्रेसला ३ तर, भाजपाला एका जागेवर आघाडी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.