HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraElections2019 LIVE UPDATE | राज्यभरात ५५. ३५ टक्के मतदान, आता निकालाची प्रतिक्षा

मुंबई | राज्यात आज (२१ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्याच्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडेल. तर येत्या २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीकरिता काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, टोकाची टीका, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, भाजपच्या दिग्गज नेत्यांचे राज्यावर असलेले लक्ष, आणि अन्य पक्षांची सुरु असलेली आपल्या अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. दरम्यान, या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज मतदार राजा आपला कौल नोंदवेल.

LIVE UPDATES महाराष्ट्र विधानसभा २०१९

 

  • राज्यात ५५.३५ टक्के मतदान झाले, कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून तर ठाण्यात ४३ टक्के सर्वात कमी मतदान झाले
  • जालन्यात मतदानावेळी सरपंच आणि उपसरपंचात चांगलाच राडा … यात मतदान बुथवर ग्रामस्थांनी कुणाला मतदान करावं यासाठी राडा झाला… दोन्ही सरपंचाची हाणामारी झाल्यानं वातावरण चांगलंच तापलेले पाहायला मिळालं
  • गडचिरोलीमध्ये मतदान संपले आहे
  • विरार चंदनसार झोन क्रमांक ६७ मतदान केंद्र ११ वर शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. त्यांच्या विरोधात निवडून भारी पथक यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे फिर्यादी बालकृष्ण मालोडे यांनी तक्रार दिली.
  • भाजपच्या राज्याच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देता ते म्हणाले की, त्या “भाजपच्या उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांना माझ्यावर टीका करणे हे बंधनकारक आहे.”

  • राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंतचे मतदान

    • मुंबई उपनगरात १३ टक्के
    • साताऱ्यात १५ टक्के
    • नंदुरबारमध्ये १९ टक्के
    • गोंदियामध्ये १५ टक्के
    • जळगाव- १२.३०
    • बुलडाणा १५.९२
    • अकोला- १५.६५
    • वाशिम- १३.१८
    • अमरावती- १५.२१
    • वर्धा- नागपूर १४.०८
    • सोलापूरमध्ये १३ टक्के
    • सांगलीमध्ये ११ टक्के
    • पालघरमध्ये १६ टक्के
    • सिंधुदुर्गमध्ये १८ टक्के
    • पुण्यामध्ये १४ टक्के
    • अहमदनगरमध्ये १४ टक्की
    • लातूरमध्ये १० टक्के
    • नाशिकमध्ये १४ टक्के
    • मुंबई उपनगर- १३ टक्के
    • मुंबई शहर- १३ टक्के
    • रत्नागिरीमध्ये १९ टक्के
    • उस्मानाबादमध्ये १२ टक्के
  • इंदापूर तालुका सकाळी ११ वाजपर्यंत १८ टक्के मतदान
  • बुलडाणा जिल्हा सकाळी 11 वाजेदरम्यान आकडेवारी

    मलकापूर – 14.78

    बुलडाणा – 15.15

    चिखली – 15.30

    सिंदखेड राजा – 16.41

    मेहकर – 16.05

    खामगांव- 17.98

    जळगांव जामोद – 15.71

    एकूण – 15.91

  • भाजप नेते प्रसाद लाड यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • अभिनेता मिलिंद गुणाजी आणि अभिनेत्री राणी गुणाजी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • कोथरूड मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी सपत्निक केले मतदान

  • आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांची मतदानानंतरची प्रतिक्रिया

  • राज्यभरात ६५ ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडाच्या तक्रारी आल्या आहेत
  • राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि परळी मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी सहकुटुंब मतदानचा हक्क बजावला आहे.
  • मतदानानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

  • शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

  • भारतीय जनता पक्षाचे इंदापूर चे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या बावडा या गावी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मीला ठाकरे, मुलगी ऊर्वशी ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे आणि त्यांची पत्नी बजावला मतदानाचा हक्क

  • सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क, धरमपेठ येथील मनपा शाळेत बजावल मतदानाचा हक्क, राज्यातील नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन

  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • मतदानापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे उमेवार धनंजय मुंडे यांनी आईचा आशिर्वाद घेऊन मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी रवाना झाले

  • भाजपचे माण-खटावचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदानकेंद्रावर दाखल

  • बॉलीवूड अभिनेता आमिर खान यांनी केले मतदान
  • बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता यांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यातील मतदानाची टक्केवारी

  • पुणे- जुन्नरमध्ये २२ टक्के
  • वाशिम जिल्ह्यात ६ टक्के
  • लातूर ग्रामीण – १० टक्के
  • जालना जिल्ह्यात – १० टक्के
  • अहमदनगरमध्ये – ९ टक्के
  • रायगडच्या अलिबागमध्ये – १२ टक्के
  • नाशिकच्या नादंगावमध्ये –
  • बीडच्या अष्टीच्या – १२ टक्के
  • मुंबई शहर सररासरी ५ टक्के
  • मुंबई उपनगरात ५ टक्के
  • नंदूरबार नवापूर – ७.५८ टक्के
  • ठाणे, कोपरी, पाचपखाडी – ५ टक्के
  • औरंगाबादतील ९ मतदार संघात – ७ टक्के
  • भाजपचे माण-खटावचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदानकेंद्रावर दाखल

  • राहुल बोन्द्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • भाजपचे सातारा लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आई कल्पनाराजे भोसले आणि पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क.
  • बुलढाण्यात लोणार तालुक्यात रात्रीपासून संततधार पाऊस. मतदान कमी होण्याची शक्यता. पावसामुळे काही गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते बंद होण्याची शक्यता. तर लोणार शहरातील रात्रभर लाईट बंद. पाऊस सुरूच

  • जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला
  • राष्ट्रवादीचे नेते आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार नवाब मलिक यांनी केले मतदान

  • महाराष्ट्र युवक काॅंग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

  • युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदार संघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना मतदानापूर्वी सिद्धीविनायकचे दर्शन घेतले.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क, कन्या आमदार प्रणिती शिंदेही उपस्थित, जागृती विद्या मंदिर नेहरु नगर येथे मतदानाचा हक्क बजावला.

  • राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले मतदान

  • वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आशिष शेलार यांनी केले मतदान

  • सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मतदान

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरोघरी राष्ट्रवादीची घडी!, परळी शहारत प्रत्येक रविवारी धनंजय मुंडे मतदात्यांच्या दारी

News Desk

“थोडे दिवस थांबा कोण घाबरतंय हे कळेल”, अनिल परबांचा फडणवीसांना इशारा

News Desk

“स्वत: घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचं?”, मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk