मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटले आहे. आषाढी एकादशी नंतर पेटलेले आंदोलन अलिकडच्या काही दिवसांपासून शांत होताना पहायला मिळत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत राज्य सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्यामुळे राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले होते.ठिय्या आंदोलन, जेलभरो आंदोलन करुनही अद्याप मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही. म्हणून मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
Live Updates:
- पुण्यातील चांदणी चौकातील परिस्थिती नियंत्रणात
- पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यलायाची आंदोलकांकडून तोडफोड
- औरंगाबाद : मराठा आंदोलकांनी २ खासगी वाहने पेटवली
- औरंगाबाद : आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या
- सकल मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण
- मराठा समन्वयकांच्या आवाहनाला गालबोट
- पुण्यातील हयात हॉटेल ची आंदोलकांकडून तोडफोड
- पुणे बंगळुरू महामार्ग आंदोलकांनी रोखला
- औरंगाबाद मध्ये 2 खाजगी वाहने पेटवली, तर एक पोलीस गाडी देखील पेटविण्यात आली
- औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बंदला हिंसक वळण
- मराठा मोर्चा समन्वयकांच्या पुण्यात सूचनेचे पालन नाही
- 18-20 वयाच्या यंग मुलांनी तोडफोड केली: पुणे जिल्हाधिकारी
- चांदणी चौकात दगडफेक, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर, एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाक्यावरही आंदोलन
- पुण्यात मराठा आंदोलन पेटलं, चांदणी चौकात राडा
- मराठा आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम
- चाकणमधील अनेक ठिकाणी मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेट सेवा बंद केली आहे.
- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे नागपूर-मुंबई रोडवर मालेगाव बायपास येथे रास्तारोको केला
- धुळ्यात बसस्थानक, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
- औरंगाबादमध्ये बंदच्या पर्श्वभूमीवर पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त
- मराठा आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
previous post