HW News Marathi
Covid-19

Lockdown Extended | ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन !

ठाणे | कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने राज्यात काही ठिकाणी आधीपासूनच सुरू असलेले लॉकडाऊन वाढवले जात आहेत तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन केले जात आहे. ठाण्यात २ जुलैपासून लॉकडाऊन सुरू होताच. मात्र, आता ठाण्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासंबंधी अधिकृत आदेशही प्रसिद्ध करण्यात आला आहे. याआधी २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. ११ जुलै रोजी हा लॉकडाउन संपणार होता. पण आता लॉकडाउनची मुदत वाढवली असून १९ जुलैपर्यंत कायम राहणार आहे.

या लॉकडाऊनमध्ये केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींना बाहेर जाण्याची मुभा देण्यात आली आहे. बाकी सर्व आधी लागू असलेले नियमच नागरिकांना पाळावे लागणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र पोलीस दलाच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा

News Desk

“निलेश राणे लवकर बरे व्हा”, रोहित पवारांनी दिल्या सदिच्छा

swarit

सांगली जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका खरेदीसाठी ४ कोटींचा निधी मंजूर

News Desk