HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले, काय आहेत नवे नियम?

मुंबई | राज्यातील कोरोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने ठाकरे सरकारने ब्रेक द चेनच्या अंतर्गत कडक निर्बंधात १ जूनपर्यंत वाढ केली आहे. १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे नियम लागू राहणार होते. त्यांच्यात वाढ करत ते १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवले आहेत. काल (१२ मे) राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी हे निर्बंध वाढवावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

काय असतील नवे नियम?

  • ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून बाहेरुन, परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीआसीरआर टेस्ट रिपोर्ट असं बंधनकारक असून प्रवेश कऱण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा.
  • कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे.
  • जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा.
  • स्थानिक बाजारपेठा तसंच एपीएमसीवर पालिकांनी लक्ष ठेवून कोरोनाच्या नियमांचं पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असेल.
  • जर एखाद्या ठिकाणी नियमांचं पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणं शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.
  • औषधं आणि करोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणाऱ्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असं सागंण्यात आलं आहे.

राज्यातील करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.या निर्बंधामुळे राज्यात करोनाची साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. १० ते १५ जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी आजूनही काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची एकमुखी मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाची नियमावली :

  • १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध वाढवले
  • लोकल मेट्रो प्रवासावर निर्बंध कायम
  • राज्यात प्रवेश करताना rtpcr निगेटीव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक
  • परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करताना ४८ तासांचा rtpcr रिपोर्ट निगेटीव्ह असणे बंधनकारक
  • भाजीपाला, किराणा घरपोच मिळणार
  • अत्यावश्यक सेवा घरपोच मिळणार
  • दुध विक्री, माल वाहतूकीस परवागनी
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा
  • माल वाहतूक प्रवासामध्ये २ जणांना प्रवासाची परवानगी
  • बाजार समितीत कोरोना नियम पाळणे अनिवार्य
  • आठवडा बाजारान प्रशासनाची करडी नजर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’च्या जाहीरातबाजीवर खर्च केले तसे आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये !

News Desk

नुकत्याच कोरोनामुक्त झालेल्या ‘न्यूझीलंड’मध्ये पुन्हा आढळले २ नवे कोरोनाबाधित

News Desk

कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित

News Desk