HW News Marathi
Covid-19

“पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित कराा”, महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांच्या मागणीनंतर आता मनसेचीही मागणी

मुंबई | कोरोना काळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे फ्रंटलाइन वकर्स म्हणून काम करत आहेत. या फ्रंटलाइन वर्कर्सचं लसीकरणही पूर्ण झालं आहे. दरम्यान या काळात महत्त्वाच्या अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे पत्रकार मात्र अद्याप फ्रंटलाइन वर्कर्सच्या यादीत येत नाहीत. पत्रकारांना देखील फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून घोषित करावं आणि त्यांचं लसीकरण पूर्ण करावं अशी मागणी गेले काही दिवस जोर धरत आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांसह विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना त्याबाबत पत्र लिहून मागणी केली आहे. दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील याबाबत मागणी केली गेली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट शेअर केली आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या मागणीचं पत्र फेसबुकवर शेअर करत असं म्हटलं आहे की, ‘करोना संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या “राज्यातील पत्रकार बांधवांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून घोषित करावं”, अशी मागणी आज मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. ‘फ्रंटलाईन वर्कर्स’मध्ये पत्रकारांचा समावेश झाल्यास त्यांचे लसीकरण तत्काळ होईलच, पण त्याच बरोबर ‘फ्रंटलाईन वर्कर्स’साठीच्या इतर सोयी-सुविधाही त्यांना मिळतील.’

या पत्रामध्ये अमित ठाकरे यांनी पत्रकारांच्या कामाबद्दल नमुद केले आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘करोना महासाथीविरोधात सुरु असलेल्या लढाईत राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस यांप्रमाणे आपले पत्रकार बांधवही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. करोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीला अत्यंत निधड्या छातीने पत्रकार बांधव सामोरे जात आहेत आणि वार्तांकनाचं आपलं काम अविरतपणे करत आहेत.’

पत्रकारांचं प्राधान्याने लसीकरण केलं जाण्याची मागणी करताना अमित ठाकरे असं म्हणाले आहेत की, ‘ त्यांच्यामुळेच या कठीण काळात राज्यभरातल्या ठिकठिकाणची वास्तव स्थिती बातम्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. दु्दैवाने, वार्तांकनाचं हे काम करताना अनेक पत्रकार, छायाचित्रकार तसंच कॅमेरामन यांना करोनाची लागण होऊन त्यामुळे त्यांपैकी काहींना आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तसंच वार्तांकनाचं आपलं काम पत्रकार बांधवांना निर्धोकपणे करता यावं यासाठी त्यांचा समावेश ‘फ्रंटलाईन वर्कर्स’च्या यादीत करण्यात येवून त्यांना संबंधित सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्यात आणि त्यांचे प्राधान्याने कोविड-१९ लसीकरण करण्यात यावे, ही आमची आग्रहाची मागणी आहे.’

या आधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ, क़ॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी केली होती. त्यामुळे आता या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk

मुंबई, पुणे मंडळात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

News Desk

“तू इतरांची काळजी घेतोय, मात्र स्वतःचीही काळजी घे”, शरद पवारांचा निलेश लंकेना फोन

News Desk